PUNE : मार्केट यार्डात शुकशुकाट; मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बंद
Updated On:

पुणे : मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजार बुधवारी बंद ठेवण्यात आला. मार्केट यार्डातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने बाजार आवारात शुकशुकाट होता. मार्केट यार्डसह मध्यभागताील महात्मा फुले मंडईतील व्यापाऱ्यांनी बंद पाळला. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी मार्केट यार्डातील अडत्यांनी बंद पाळला.
मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजार, तसेच फूल बाजारातील अडते बंदमध्ये सहभागी झाले होते. मार्केट यार्डासह मध्यभागातील महात्मा फुले मंडईतील किरकोळ विक्रेत्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवले. एरवी गजबजलेल्या मार्केट यार्ड, मंडई परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. बाजार बंद ठेवण्यात आल्याने बुधवारी शेतीमालाची आवक झाली नाही.





