Pune Crime : पुणे कोर्टाबाहेरील हल्ला प्रकरण; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी
Pune Crime : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर मंदार किवळे याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Pune Crime : पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेर मंदार किवळे (Pune Crime )याच्यावर झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ला प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी (२६ नोव्हेंबर) अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एस. डी. पंजवानी यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्ष आणि आरोपींच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली.
पोलिसांनी आरोपींच्या दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. हल्ल्यासाठी वापरलेली शस्त्रे कुठून आणली, हल्ल्याचे नियोजन कसे केले आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. (Pune Crime)
सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलमधील पुराव्यांचाही तपास करायचा असल्याचे त्यांनी न्यायालयात मांडले. मात्र, केवळ एकाच ठिकाणी राहत असल्यामुळे आरोपी केल्याचा दावा बचाव पक्षाने केला.
दरम्यान, २५ नोव्हेंबरला न्यायालयाच्या गेट क्रमांक चारजवळ मंदार किवळे याच्यावर गोळीबार करून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. २०२५ मधील शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय आहे. या प्रकरणात पाच प्रौढ आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.





