पुणे-सातारा डेमो बंद पडण्याचा प्रकार; सुप्रिया सुळे व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या….

Supriya Sule | पुणे-सातारा डेमू रेल्वेगाडी पुण्याहून सातारा आणि साताऱ्याहून पुणे अशी दररोज धावत असते. मात्र, ही रेल्वे बंद पडण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. यामुळे या रेल्वेगाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नुकतीच पुणे-सातारा ही डेमू रेल्वे शिंदवने घाटात धोकादायक ठिकाणी बंद पडली होती. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
यानंतर प्रवाशांनी याविषयी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या. या प्रकारानंतर आता बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याविषयी त्यांच्या एक्स हॅन्डलवर एक पोस्ट आणि त्याखाली बंद पडलेल्या रेल्वेगाडीचा व्हडिओ शेअर केला आहे.
पुणे-सातारा डेमू गाडीच्या बाबतीत दररोज तक्रारी येत आहेत. नुकतीच ही गाडी शिंदवने घाटात धोकादायक ठिकाणी गाडी बंद पडली होती. असे प्रकार सातत्याने घडत असून याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याची गांभार्याने नोंद घ्यावी, अशी मागणी त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यालयाला केली आहे. तसेच रेल्वे गाडी बंद पडण्याच्या प्रकारामुळे नोकरदारांना पुणे स्टेशनवर वेळेत पोहचता येत नाही. अनेकांवर नोकरी गमवण्याची वेळ आली आहे. ही खेदजनक बाब असल्याचे सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
पुणे-सातारा डेमू गाडीच्या बाबतीत दररोज तक्रारी येत आहेत. नुकतीच ही गाडी शिंदवनी घाटात धोकादायक ठिकाणी गाडी बंद पडली होती. असे प्रकार सातत्याने घडत असून याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गाडीने मोठ्या संख्येने नोकरदार, विद्यार्थी, कामगार आदी वर्ग प्रवास करीत असतो.… pic.twitter.com/IKBwU8U0DS
— Supriya Sule (@supriya_sule) March 23, 2025
नेमकं काय म्हणाल्या?
या गाडीने मोठ्या संख्येने नोकरदार, विद्यार्थी, कामगार आदी वर्ग प्रवास करीत असतो. गाडी बरेचदा वेळेत पोहोचत नाही असे प्रवाशांचे म्हणणे आहे. यामुळे काही जणांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. याखेरीज ही गाडी थेट पुणे स्टेशनवर पोहोचत नाही. त्यामुळे देखील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही अतिशय खेदजनक बाब आहे. माझी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनीजी वैष्णव यांना नम्र विनंती आहे की कृपया आपण याची गांभीर्याने नोंद घेऊन प्रवाशांना येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्या.





