PUNE: राज्यातील सर्व किल्ल्यांवर भगवा व तिरंगा फडकवणार
Updated On:

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदाच्या ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाकडूनही येत्या २६ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्रातील ३५० किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून भगवा आणि तिरंगा ध्वज फडकवणार आहेत.
त्यासाठी महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन अखिल महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी केले. त्यासाठी कार्यकारी अध्यक्ष हृषिकेश यादव, सचिव डॉ. राहुल वारंगे, सहसचिव राहुल मेश्राम, खजिनदार दिपाली भोसले यासह पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, मुंबई, पालघर, रायगड, अहमदनगर या सर्व जिल्ह्यातून १०० हून अधिक संस्था परिश्रम घेतत आहे.





