Sunetra Pawar : काय ही घाण? दिवसभर करता तरी काय?; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देत आरोग्य सेवांचा आढावा घेतला.

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देत आरोग्य सेवांचा आढावा घेतला. कोणतीही पूर्वसूचना न देता केलेल्या या पाहणीत त्यांनी रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, औषधांचा पुरवठा आणि प्रशासनाच्या कामकाजाची तपासणी केली. (Sunetra Pawar)
पाहणीदरम्यान रुग्णालयातील काही भागात अस्वच्छता आढळून आल्याने सुनेत्रा पवार यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. “ही काय घाण आहे? इथे उशी पडलेली दिसतेय. दिवसभर करता तरी काय? फक्त मोबाईलच बघता का?” अशा शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांना खडसावले. यावेळी उपस्थित अधिकारी आणि डॉक्टरांनाही त्यांनी कामात अधिक जबाबदारीने लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या.
रुग्णालयातील विविध विभागांना भेट देत त्यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. उपचारांबाबत कोणत्या अडचणी येतात, सुविधा पुरेशा आहेत का, याची थेट माहिती घेतली. तसेच आरोग्य सेवांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये आणि नागरिकांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. (Sunetra Pawar)

Sunetra Pawar : काय ही घाण? दिवसभर करता तरी काय?; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
रुग्णालय परिसरात स्वच्छता राखणे, रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध करून देणे आणि कामात हलगर्जीपणा टाळणे याबाबतही त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या. प्रशासनाने जनतेच्या अपेक्षांनुसार काम करावे, असा संदेशही त्यांनी दिला. (Sunetra Pawar)
सुनेत्रा पवार यांच्या या अचानक भेटीमुळे रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली. प्रत्यक्ष पाहणी करून कामातील त्रुटींवर बोट ठेवण्याची त्यांची कार्यपद्धती पाहून अनेकांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीची आठवण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Sunetra Pawar)
बारामतीतील आरोग्य व्यवस्थेत अधिक सुधारणा व्हाव्यात आणि नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी अशा पाहण्या भविष्यातही सुरू राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Sunetra Pawar)





