Shikrapur News : शिक्रापुरात रात्रगस्तीदरम्यान पोलिसांची मोठी कारवाई; १.९० लाखांचा गांजा जप्त, दोघांना अटक
Shikrapur News : शिक्रापूर येथे रात्रगस्तीदरम्यान पोलिसांनी एका संशयित दुचाकीचा पाठलाग करून दोघांना रंगेहात पकडले.

Shikrapur News : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे रात्रगस्तीदरम्यान पोलिसांनी गांजा घेऊन जाणाऱ्या दोन युवकांना पकडले. त्यांच्याकडून सुमारे १ लाख ९० हजार रुपये किमतीचा गांजा आणि गांजा वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. सागर हरिभाऊ घुमरे (वय २२) आणि मनीषकुमार मनिकांतप्रसाद सिंग (वय २८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. (Shikrapur News)
रात्रगस्तीदरम्यान संशयित दुचाकी आढळली
शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंडित मांजरे आणि योगेश आव्हाड हे १३ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास शासकीय वाहनातून तळेगाव-शिक्रापूर रस्त्यावर रात्रगस्त घालत होते. यावेळी एका संशयित दुचाकीवरून दोन युवक जाताना त्यांच्या निदर्शनास आले. (Shikrapur News)
पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दुचाकीवरील युवकांचा पाठलाग सुरू केला. याबाबतची माहिती इतर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी आणि इतर कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी धाव घेत दोघांना अडवले. (Shikrapur News)
पिशवीच्या तपासणीत गांजा आढळला
पोलिसांनी दोघांकडील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये गांजाचा साठा आढळून आला. फॉरेन्सिक पथकातील प्रणोती पटले, मुस्तकीम सय्यद आणि प्रेम भालेराव यांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. (Shikrapur News)
या कारवाईत सुमारे १ लाख ९० हजार रुपये किमतीचा गांजा आणि एमएच १० डीबी ७०१० क्रमांकाची दुचाकी पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर दोन्ही युवकांना ताब्यात घेण्यात आले. (Shikrapur News)
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पंडित संपत मांजरे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सागर हरिभाऊ घुमरे (रा. खालुंब्रे, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. आरोळवस्ती, जामखेड, जि. अहिल्यानगर) आणि मनीषकुमार मनिकांतप्रसाद सिंग (रा. पसारा बघनगम, ता. मोहकर, जि. बेगुसराय, बिहार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी करत आहेत. (Shikrapur News)





