Pune : राज्यातील मोफत गणवेश योजनेसाठी ५३ कोटी मंजूर
Updated On:

पुणे – केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा योजनेत राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट व पायमोजे देण्यासाठी ५३ कोटींचा उर्वरित निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सर्व मुली, अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्यरेषेखालील मुले यांना ही योजना लागू असून, त्यासाठी दोन गणवेशासाठी ६०० रुपये दिले जातात, तसेच एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे यासाठी प्रतिविद्यार्थी १७० रुपये दिले जातात. राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने शासनाकडे यासाठी १४० कोटींची मागणी केली होती.
यातील ८७ कोटी वितरीत केले होते. बाकीचा ५३ कोटींचा निधी शिक्षण परिषदेस देण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिल्याचे शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव प्रमोद पाटील यांनी स्पष्ट केले आहे.





