Pune : महाआरोग्य सप्ताहाला प्रतिसाद; आमदार सुनील कांबळे यांच्या वतीने आयोजन

पुणे – पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात महाआरोग्य तपासणी सप्ताह या आरोग्य शिबिराचे आयोजन आमदार सुनील कांबळे यांच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिरात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय कक्षाच्या साह्याने, तसेच बी. जे. मेडिकल, जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या संयुक्त विद्यमानाने वानवडी येथे हे शिबिर घेण्यात आले.
याप्रसंगी भाजपा पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष सुशांत निगडे, ससून रुग्णालयाचे डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. येल्लप्पा जाधव, डॉ. प्रमोद खराडे, डॉ. अस्मिता जाधव, डॉ. प्रीती लोखंडे, धर्मादायचे रुपेश गायकवाड, डॉ. शंकर मुगावे, डॉ. दीपक बढे, डॉ. शिवाजी मुंढे.
एच.एल.एल लॅबचे प्रतिनिधी, तसेच संपूर्ण रुग्णालयांची टीम, स्थानिक भाजपा पदाधिकारी समीर शेंडकर, कोमल शेंडकर, माजी नगरसेविका कालिंदा पुंडे, धनराज घोगरे, उमेश शिंदे, दिनेश होले, सुरेखा गायकवाड, दीप्ती सेठिया, प्रवीण खेडकर, अमर वनवे, स्मिता खेडकर, अरुणाताई शिंदे व स्थानिक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





