पुणे : पुण्यातील युवा उद्योजक पुनीत बालन यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल स्वर झंकार महोत्सवात रसिकाग्रणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पं. अतुलकुमार उपाध्ये, पं. विजय घाटे आणि पद्मश्री हरिहरन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशात सर्वाधिक शहरांमध्ये स्वरझंकार संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. पुण्यात या महोत्सवाचे सोळावे वर्ष आहे. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी या महोत्सवात वादन केले आहे. याच महोत्सवात बालन यांच्या विविध क्षेत्रातील अतुलनीय अशा सामाजिक कार्याची दखल घेऊन उपाध्ये व्हायोलिन वादन विद्यालयाच्यावतीने स्व. दाजीकाका गाडगीळ यांच्या स्मरणार्थ रसिकाग्रणी हा मानाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी जावेद अली, राहुल देशपांडे, राजस आणि तेजस उपाध्ये यांचीही उपस्थित होती. सैनिक, अनाथ, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मदत, रुग्णांना मदत, उदयोन्मुख खेळाडूंना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारी सर्वोतोपरी मदतही पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून ते करतात. स्वरझंकार संगीत महोत्सवात रसिकाग्रणी पुरस्काराने सन्मान झाल्याने मनस्वी आनंद झाला. या पुरस्काराने भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी निश्चितपणे प्रोत्साहन मिळाले असून, या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी आयोजकांचा मनापासून आभारी आहे. – पुनीत बालन, युवा उद्योजक काश्मीरमध्ये सर्वांत उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्याचे काम बालन यांनी त्यांच्या मातोश्री इंद्राणी बालन फाउंडेशनच्या माध्यमातून केले आहे. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख आणि विश्वस्त म्हणून काम करतात.