Pune Rain Update | Eknath Shinde: पुण्यात रविवारी सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे. मागील आठवड्यात पुण्यात पुरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले होते. यातच आता आज पुण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. खडकवासला धरणातून आज सकाळी 11 वाजता मुठा नदीत सध्या 35000 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. एकतानगर मधील द्वारका अपार्टमेंटचे पार्किंग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. एकतानगर मधील इतर सोसायटीच्या बाहेर सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे. भारतीय लष्कर जवान, अग्निशमन दल पोलीस कर्मचारी तसेच महापालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. सिहंगड रस्ता, एकता नगरी येथे पाण्याची पातळी वाढत असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी सद्यस्थितीत जवळपास 25 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. याबरोबरच एक श्वान एक मांजर यांची ही काळजी घेत आपले कर्तव्य बजावले. तर पिंपरी चिंचवड येथे NDRF तैनात करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषेच्या आतील नागिरकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याआधीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष असल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे शहर महापालिका आयुक्त आणि आपतकालिन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशा फोनवरून चर्चा केली आहे. ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषाच्या आत रहाणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकानथ शिंदे यांनी सर्व स्थलांतरीत नागरिकांच्या दोन्ही वेळ जेवणाची, रहाण्याची आणि त्यांना लागेल ती मदत करण्याचीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिलेत. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री पासूनच खडकसवाला धरण साखळी परिसरात जोरदार पाऊस असल्याने मोठया प्रमाणात नदीत पाणी सोडावे लागणार होते. त्यामुळे सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय आणि अग्निशमनदलाचे स्वतंत्र पथक या भागात तैनात करण्यात आले आहे. पथकाकडे बोटीसह, इतर आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या असून नागरिकांंना बाहेर काढल्यास त्यांच्यासाठीची इतर सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.