Pune Railway Suicide | रेल्वेसमोर जीव देतो म्हणाला…दोन दिवसांपूर्वी रोखले ; शेवटी उडी घेऊन संपवलं आयुष्य

प्रभात वृत्तसेवा
सोरतापवाडी – पुणे-दौंड लोहमार्गावरील पेठ परिसरात रेल्वे समोर उडी घेऊन एका 45 वर्षीय विवाहित तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 10) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.सतीश काशिनाथ लोणकर (वय 45, रा. पेठ, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नेमक्या कोणत्या कारणासाठी उडी घेतली याची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. सतीश लोणकर हा कुटुंबासोबत पेठ परिसरात राहतो.
मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालव होते. त्याला दारू पिण्याचे व्यसन असल्याची माहिती काही नातेवाईकांनी दिली. मागील दोन दिवसांपूर्वीिीह त्याने रेल्वेसमोर जाऊन जीव देण्याचा प्रयत्न केला होता; मात्र काही नागरिकांनी त्याची समजूत काढून त्याला थांबवले होते. बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुणे-दौंड लोहमार्गावरील नायगाव -पेठ परिसरात आलेल्या रेल्वे समोर उडी घेऊन सतीश लोणकर याने आत्महत्या केली.



