pune : हर्षदा देशमुख- जाधव, कौस्तुभ गावडे विजयी
pune :

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच चुरस
pune : राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनलेली आणि मतदानाचा टक्का वाढल्यामुळे लक्ष लागलेल्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख- जाधव विजयी झाल्या आहेत, तर शिक्षक मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे हे विजयी झाले आहेत.
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी (दि. २७) मतमोजणीस सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी पसंतीक्रमानुसार मतदान होत असल्याने मतमोजणीस उशीर होतो.
पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख- जाधव यांनी भाजपचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांचा पराभव केला, तर शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी शिवसेनेचे उमेदवार सचिन सानप यांचा पराभव केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेनेची बंडखोरी भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या पथ्यावर पडली. या मतदारसंघातील बहुरंगी लढतीत गावडे यांच्या विजय झाला. मात्र, मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी गावडे यांना २७ व्या फेरीपर्यंत वाट पाहावी लागली, तर शिवसेनेचे उमेदवार सचिन सानप यांना दुसऱ्या पसंतीक्रमांची मते मिळाली.
या मतदारसंघातील माजी आमदार दत्ता सावंत यांना तिसऱ्या, तर विद्यामान आमदार जयंत आजगावकर यांना चौथ्या पसंतीक्रमांकावर समाधान मानावे लागले. गावडे यांनी शिवसेनेचे उमेदवार सानप यांचा तब्बल ६ हजार ७७० मतांनी पराभव केला.
एकूण वैध मतांमधून २५ हजार ७५६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. त्यात गावडे यांना निर्धारित मते न मिळाल्याने २७ बाद फेऱ्यांनतर २३ हजार १७७ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सानप यांना १६ हजार ३४७ मते मिळाली.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख- जाधव यांना १ लाख १३ हजार ८४० मते, तर भाजपचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना १ लाख ३ हजार ९१२ मते पडली. हर्षदा देशमुख यांनी डॉ. जाधव यांचा ९ हजार ९२८ मतांनी पराभव केला.





