पुणे : आरोग्य उत्तम असेल तर घर ही उल्हास आणि ऊर्जेने परिपूर्ण राहतं. रियल इस्टेट सेक्टर मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या व्यंकटेश बिल्डकॉनसाठी केवळ उत्तम घरे बांधणेच नव्हे, तर आपल्या कर्मचाऱ्यांचे आणि कामगारांचे आरोग्य जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी प्रत्येकाला सुरक्षित, आनंदमयी आणि स्वस्थ वातावरण मिळावे, यावर कंपनीचा नेहमीच भर राहिला आहे, असे मत श्री व्यंकटेश बिल्डकॉन चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अंकुश आसबे यांनी व्यक्त केले. श्री व्यंकटेश बिल्डकॉनच्या रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले असून यानिमित्ताने विविध कंपनीच्या वतीने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन काण्यात आले आहे. त्या निमित्ताने व्यंकटेश एरंडवणे सेंट्रल येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी आमदार कुमारभाऊ गोसावी यांच्या हस्ते झाले. यावेळी अॅड. उन्मेश देशपांडे, लहुराज आसबे, हेमंत गोसावी, शुभांगी आसबे, पीयुषा आसबे आणि अमित मोडगी उपस्थित होते. या शिबिरात अहिल्या हेल्थ हेल्पलाइन आणि सत्यशिव ग्लोबल फाउंडेशनचे डॉ. रोहित बोरकर यांच्या सहकार्याने विविध तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली.२२ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या वर्धापनदिन सोहळ्यात दररोज वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.