Pune: प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे घवघवीत यश

पुणे – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालात घवघवीय यश मिळविले आहे. संस्थेच्या सहापैकी चार कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
शिवाजीनगर येथील माॅडर्न कनिष्ठ महाविद्यालयाचा निकालही यंदाही चांगला लागला आहे. त्यात वाणिज्य शाखेचा निकाल सर्वोत्कृष्ट आहे. कला शाखेचा निकाल 76.17 टक्के, तर विज्ञान शाखेचा 92.35 टक्के आणि वाणिज्य शाखेचा निकाल 98.04 टक्क्के लागला आहे, अशी माहिती प्राचार्य डाॅ. राजेंद्र झुंजारराव यांनी दिली.
तसेच, गणेशखिंडच्या माॅडर्न महाविद्यालयचा इयत्ता बारावी निकालात वाणिज्य शाखेचा 95.71 टक्के, तर एमसीव्हीसी शाखेचा 92.53 टक्के इतका लागला आहे. निगडीच्या माॅडर्न कनिष्ठ महाविद्यालय, भोसे येथील माॅडर्न महाविद्यालय आणि पाषाण येथील माॅडर्न काॅलेजचा निकाल शंभर टक्के लागला आहे. वारजे येथील माॅडर्न महाविद्यालयातील कला, विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के, तर वाणिज्य शाखेचा ९५ टक्के लागला आहे.
संस्थेचे कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष डाॅ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. सुरेश तोडकर आणि प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी सर्व महाविद्यालयांमधील प्राचार्य, उपप्राचार्य शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.





