Pune : डाळींच्या भावात घसरण सुरू ; साखरेची भाववाढ

पुणे : आवक वाढत असल्यामुळे तुरडाळ आणि हरभरा डाळीतील घसरण सुरूच आहे. बेसन आणि भाजकी डाळेच्या भावातही मोठी घट झाली आहे. आवक वाढल्यामुळे शेंगदाण्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. शेंगदाणा तेलाच्या भावातही डब्यामागे १०० रुपयांनी घट झाली. तुरडाळ, हरभराडाळ आणि बेसनाचे भावात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. चालू महिन्यासाठी केंद्र सरकारने साडे बावीस लाख टनाचा कोटा खुला केला आहे. यंदा साखर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून २६५ लाख टनापर्यंत उत्पादन कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून साखरेची भाववाढ सुरू आहे. अपुऱ्या कोटयाच्या घोषणेमुळे भावाढीस आणखी चालना मिळाली असून मागील आठवड्यात क्विंटलमागे आणखी १०० रुपयांनी वाढ झाली. आवक-जावक साधारण असल्यामुळे गुळाचे भाव सर्वसाधारणपणे स्थिर होते. पुढील आठवड्यापासून गुळाची उलाढाल वाढेल, असा अंदाज आहे.
डाळींमधील घसरण सुरूच आहे. तुरीचे उत्पादन यंदा मुबलक प्रमाणात झाले असून बाजारात आवक वाढली आहे. यामुळे तुरडाळीच्या भावात घसरण सुरूच आहे. गेल्या आठवड्यातही भावात क्विंटलमागे आणखी ५०० ते एक हजार रुपयांची घट झाली. नव्या हरभऱ्याची आवक सुरू झाल्याळे हरभरा डाळीचे भावही क्विंटलमागे आणखी ४०० ते ५०० रुपयांनी कमी झाले. त्यामुळे बेसन भावातही ५० किलोमागे ३०० रुपयांनी तर भाजकी डाळच्या भावात ४० किलोमागे ३०० ते ४०० रुपयांनी घट झाली. आवक वाढल्यामुळे हुलग्याच्या भावात क्विंटलमागे ५०० रुपयांनी घट झाली.
लवकरच नवा हंगाम सुरु होणार असल्यामुळे विक्रमी भावाने विक्री होणाऱ्या हिरव्या वाटाण्याच्या भावात घसरण सुरू झाली असून भाव आणखी मोठ्या प्रमाणात उतरतील, असा अंदाज आहे. भाव मंदीत असल्यामुळे सध्या बाजारात उठाव कमी असल्याचे सांगण्यात आले. आवक-जावक साधारण असल्यामुळे अन्य सर्व डाळी आणि कडधान्यांचे भाव सर्वसाधारणपणे स्थिर होते. येत्या काही दिवसांत नव्या गहू तसेच ज्वारीची आवक सुरू होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे गव्हाची भाववाढ थांबली असून गेल्या आठवड्यात मिलबर गव्हाच्या भावात क्विंटलमागे ५० रुपयांनी घट झाली. ज्वारी, बाजरी तसेच तांदळाचे भाव स्थिर होते. शेंगदाणा, शेंगदाणा तेल भावात घसरण झाली आहे. भूईमूग शेंगेची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या निर्यात बंद असल्यामुळे भाव मंदीत आहेत. आठवडाभरात सर्व प्रकारच्या शेंगदाण्याच्या भावात क्विंटलमागे आणखी ४०० ते ५०० रुपयांनी घट झाली. मात्र, भारी प्रतीच्या स्पॅनिश शेंगदाण्याची आवक मर्यादीत असल्याने भावातील तेजी कायम आहे.
साबुदाणा. मिरची, नारळ, पोहे या पदार्थांचे भाव स्थिर होते. शेंगदाण्याचे भाव घसरल्यामुळे शेंगदाणा तेलाच्या भावातही मोठी घट झाली. गेल्या काही दिवसांत शेंगदाणा तेलाच्या भावात १५ किलोच्या डब्यामागे १०० रुपयांनी घट झाली. अन्य सर्व खाद्यतेलांचे भाव स्थिर होते. मात्र, तुटवड्यामुळे खोबरेल तेलाच्या भावात १५ किलोच्या डब्यामागे आणखी २०० रुपयांनी वाढ झाली.
घाऊक बाजारातील भाव पुढील प्रमाणे :
साखर (प्रति क्विंटल) ३८००-३८५० रुपये
खाद्यतेले (१५किलो/लिटर) : शेंगदाणा तेल २३००-२४००, रिफाईंड तेल २०००-२७५०, सरकीतेल १९३०-
२२५०, सोयाबीन तेल १९००-२१५०, पामतेल २०००-२२००, सूर्यफूल रिफाईंड तेल २०३०-२१७०,
वनस्पती तूप २१५०-२४५०, खोबरेल तेल ३८००-३००० रुपये
तांदूळ : गुजरात उकडा ३५००-४०००, मसुरी ३५००-४०००, सोना मसूरी ४५००-५०००, एच.एम.टी.
कोलम ५५००-६५००, लचकारी कोलम ६५००-७०००, चिन्नोर ४५००-५०००, (११२१)-११०००-
११५००, आंबेमोहोर (सुवासिक) ९०००-९५००, बासमती अखंड १२०००-१३०००, बासमती दुबार
९५००-१०००, बासमती तिबार १००००-१०५००, बासमती मोगरा ५५००-६५००, बासमती कणी
४०००-४५००, (१५०९) -८५००-९५००, इंद्रायणी ५५००-६००० रुपये.
गहू- लोकवन नं. १ ४४००-४५००, लोकवन नं. २ ३९००-४२००, नं. ३ ३४००-३६००, सिहोर नं.
१५७००-६०००, सिहोर नं. २५००० – ५०००, सिहोरी ४०००-४४००, मिलबर ३५०० रुपये.
ज्वारी : गावरान नं.१ ५२००-५५००, गावराननं.२४५००-४८००, नं.३३५००-३८००, दूरीनं.१३६००-
४०००, दूरी नं.२ ३२००-३५०० रुपये.
बाजरी : महिको नं. १ ३७००-३८००, महिको नं २ ३३००-३५००, गावरान ३५००-३६००, हायब्रीड
३२००-३३०० रुपये.
गूळ : गूळ एकस्ट्रा ३९५०-४१५०, गूळ नं.१ ३७५०-३९००, गूळ नं. २ ३६००-३७०० गूळ नं. ३ ३४५०-
३५५०, नं. ४ ३३००-३४००, कऱ्हाड बॉक्स पॅकिंग ४५००-५०००, केडगांव बॉक्स पॅकिंग ३३००-
४१०० रु.
डाळी : तूरडाळ १००००-१२०००, हरभरा डाळ ७१००-७२००, मूगडाळ ९०००-१००००, मसूरडाळ
७६००-७७००, मटकी डाळ ८२००-८३००, उडीद डाळ १००००-११००० रुपये.
कडधान्ये : हरभरा ६५००-६८००, हुलगा-६०००-६२०० चवळी ७५००-१२०००, मसूर ६८००-६९००,
मूग ८५००-९३००, मटकी गावरान ७५००-८०००, मटकी पॉलिश ६०००-६६००, मटकी गुजरात ६०००-
६५००, मटकी राजस्थान ६०००-६५००, मटकी सेलम १०००-१०५००, वाटाणा हिरवा ११०००-२०००,
वाटाणा पांढरा ४०००-४२००, काबुली चणा ९०००-१४००० रुपये.
साबुदाणा : साबुदाणा नं. १ ६५००, साबुदाणा नं.२ ६०००, साबुदाणा नं.३ ५८०० रुपये.
वरई भगर : १०५००, सावा भगर १०००, गोटा खोबरे १८००-२००० रुपये.
शेंगदाणा : जाडा ८०००-८७००, स्पॅनिश–१००००, घुंगरु ८३००-८४०० टीजे ६८०० रुपये.
धने : गावरान ८०००-९०००, इंदूर ११०००-१५००० रुपये.
पोहे : मध्य प्रदेश ४७००-५०००,पेण ४३००-४५००,मध्यम पोहा ४७००-४९००, दगडी पोहा ४७००-
५१००, पातळ पोहा ५०००-५८००, सुपर पोहा ५३००-५८००, भाजका पोहा ६५०-७५०, मका पोहा
६२५-७२५, भाजके डाळे ३६००-४०००, मुरमुरा सुरती (९किलोस) ५६०, भडंग ९००-१०५०, घोटी ५५० रुपये.
रवा, मैदा, आटा- (५० किलोचा भाव) आटा १९००-२०००, रवा १९००-२०००, मैदा १९००-२०००,
बेसन : (५०किलोस) ४२००-४५०० रुपये.
मीठ : मीठ खडे (५० किलोस) २२५, मीठ दळलेले (५० किलोस) २५० रुपये.
मिरची : काश्मीरी ढब्बी ३००००-३५०००, ब्याडगी १८०००-२१०००, लवंगी तेजा २०००-२२०००, गुंटूर
१८०००-२००००, खुडवा गंटूर ७०००-८०००, खुडवा ब्याडगी ८०००-९००० रुपये.
नारळ : (शेकड्यांचा भाव) : नवा पॅकिंग २०००-२१००, मद्रास ३८००-३९००, पालकोल जुना २१००-
२२००, सापसोल ३८००-३९०० रुपय.





