पुणे: प्रणय शिंदेंचा भाजपात प्रवेश
Updated On:

पुणे – पुणे महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे पुतणे आणि थोर समाजसेवक तुकाराम शिंदे यांचे नातू प्रणय शिंदे यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रणय शिंदे यांचे पक्षात स्वागत करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, गटनेते गणेश बिडकर, सरचिटणीस राजेश पांडे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर आदी उपस्थित होते. शिंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना भाजपा युवा मोर्चा पुणे शहरच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
टॅग्स:





