Maharashtra Politics : खासदार ओमराजेंच्या घरातच शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी! प्रताप सरनाईक आले अन् वाद पेटला; नेमकं कारण काय?
Maharashtra Politics : धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत खासदार ओमराजे निंबाळकरांच्या निवासस्थानी शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

Maharashtra Politics : धाराशिवमध्ये शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, पालकमंत्री प्रताप सरनाईक हे ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी आले असतानाच हा प्रकार घडला. ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. (Maharashtra Politics)
शाब्दिक वादाचं रुपांतर हाणामारीत
मिळालेल्या माहितीनुसार, दोन कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. पाहता पाहता या वादाचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. त्यामुळे काही काळ ओमराजे यांच्या निवासस्थानी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
जयराजे निंबाळकर यांनी केला हस्तक्षेप
कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू झाल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू जयराजे निंबाळकर यांनी वेळीच हस्तक्षेप करत वाद मिटवला. त्यामुळे परिस्थिती अधिक चिघळण्यापासून वाचली. (Maharashtra Politics)
ओमराजेंच्या पक्षप्रवेशानंतर राजकीय समीकरणं बदलली
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच ठाकरे गटाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासह आणखी पाच खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केल्याने धाराशिवसह राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. (Maharashtra Politics)
मात्र, पक्षप्रवेशानंतर काही दिवसांतच ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे शिंदे गटातील अंतर्गत मतभेदांची चर्चा सुरू झाली आहे. या वादामागचे नेमके कारण काय होते आणि पक्षाकडून याबाबत काही भूमिका घेतली जाते का, याकडे आता लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)





