पूजा चव्हाणप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई; अरुण राठोडला घेतले ताब्यात
Updated On:

पुणे – पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी अरुण राठोडला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करण्यात येणार आहे.
मागील दहा दिवसांपासून गायब असलेला अरुण राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. अरुण राठोडची आता पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे.
दरम्यान, अरुण राठोड हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळीचा रहिवासी आहे. परळीच्या दारावती तांडा येथे त्याचे घर आहे. तो शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे.





