Pune Police : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाने उचललं टोकाचं पाऊल; सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडल्याची माहिती
Pune Police : पुणे शहर पोलीस दलातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी समोर आली आहे.

Pune Police : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (7 ऑक्टोबर) घडली. औंध परिसरातील त्यांच्या निवासस्थानी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. (Pune Police)
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश भाऊसाहेब पाटील असे मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते सध्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत होते. औंध येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती आहे. (Pune Police)
गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर चतुःश्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. (Pune Police)
आजारपणामुळे नैराश्य होते?
निलेश पाटील हे गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. या आजारपणामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण काय होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. (Pune Police)
निलेश पाटील यांनी यापूर्वी विश्रामबाग पोलीस ठाण्यासह पुणे शहरातील इतर पोलीस ठाण्यांमध्येही सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. घटनेनंतर चतुःश्रृंगी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आत्महत्येचे नेमके कारण आणि अन्य बाबी तपासातून स्पष्ट होणार आहेत. (Pune Police)



