Pune : PMPML च्या ब्रेकडाऊन बसलाच लागली आग..
Updated On:

पुणे – Pmpml ची बस बंद पडल्यानंतर त्यांना घेऊन जाणारी बसच मंगळवारी ‘डाऊन’ झाली.डाऊन झालेल्या बसला कर्मचारी बाजूला घेत असताना अचानक आग लागली.

नाना पेठेतील संत कबीर चौकामध्ये ही बस सुरुवातीला बंद पडली. त्यानंतर कर्मचारी ही बस ढकलत निघाले होते. त्यावेळी बसमधून अचानक धूर येऊ लागला.
या बसने पेट घेतला. ही घटना सामाजिक कार्यकर्ते अमोल तुजारे यांनी पाहिली. त्यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग विझवली. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
सुरुवातीला त्यांना आंदोलनाचा प्रकार वाटला. मात्र, नागरिकांनी आणि पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना ही घटना तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचे स्पष्ट केले.सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.





