Pune-Pimpri 40 Senior Citizen Stuck In Dubai : दुबईमध्ये माजी नगरसेविकेसह पुणे-पिंपरीचे ४० जण अडकले; कुटुंबियांकडून चिंता व्यक्त
Pune-Pimpri 40 Senior Citizen Stuck In Dubai : 'सध्या आम्ही सुरक्षित आहोत. मात्र भारत सरकारने येथून आमची सुटका करुन मायदेशी सुखरूप घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावेत,' अशी विनंती दुबईमध्ये अडकलेल्या अनिता नेटके यांनी केली आहे.

Pune-Pimpri 40 Senior Citizen Stuck In Dubai : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर शनिवारपासून हल्ले सुरू केल्याने युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जण दुबई, बहरीन, दोहा या ठिकाणी अडकले आहेत. या युद्धामुळे जगभरातील अनेक विमान उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. याचा फटका पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील सुमारे ४० जणांना बसला आहे. विशेषत: यात ज्येष्ठ नागरिक अधिक आहेत.
ते सर्वजण सुखरूप असून, दुबईमध्ये ब्रो खोलपा जवळील एका हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलेले आहे. यात माजी नगरसेविका सुमन नेटके, राष्ट्रवादीच्या पुणे शहर उपाध्यक्ष उषा नेटके, उद्योजिका अनिता नेटके यांचाही समावेश आहे. त्यातील जगदीश या तरुणाने व्हिडिओ करून भारत सरकारकडे त्यांना सोडविण्याची विनंती केली आहे.
जगदीश म्हणाले, “आम्ही ४० जण दुबईमध्ये आहोत. आमचे भारत व महाराष्ट्र सरकारला निवेदन आहे की, त्यांनी आमची लवकर सोडवणूक करावी. आमच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत. सर्व राजकीय पक्षांची, नेत्यांची ही जबाबदारी आहे की, त्यांनी आमची सोडवणूक करावी आणि भारतामध्ये सुखरूप न्यावे. आम्हाला सर्वांनी वाचवावे. इथे सर्वजण खूप घाबरलेल्या अवस्थेत आहेत. आमच्या हॉटेलजवळच बॉम्ब हल्ला झालेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर इथून आमची सुटका करावी.’’
‘‘आम्ही ४० जण दुबईमधील एका हॉटेलमध्ये अडकलो होत. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक अधिक असल्याने सर्वजण खूप घाबरले आहेत. भारत सरकारने काहीही करून आम्हाला इथून घेऊन जावे. सध्या आम्ही सुरक्षित आहोत. मात्र आमची सर्व राजकीय नेत्यांना विनंती आहे की, त्यांनी येथून आमची सुटका करुन मायदेशी सुखरूप घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावेत,’’ अशी विनंती दुबईमध्ये अडकलेल्या अनिता नेटके यांनी केली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, २५ फेबुवारीला ‘कॅप्टन इंडिया टुर्स’च्या माध्यमातून पुणे-पिंपरी चिंचवडमधील ४० पर्यटक दुबईला गेले होते. मात्र २८ तारखेपासून सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हे पर्यटक तेथेच अडकले आहे. यामुळे आता या पर्यटकांच्या कुटुंबाकडून देखील चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :






