pune: पीएफ कार्यालयाची आज विशेष मोहीम
Pune: केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतील, ईपीएफओ म्हणजेच, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या, पुण्याच्या प्रादेशिक कार्यालयाने, निष्क्रिय ईपीएफ खात्यांमधून, पैसे ग्राहकांच्या इतर खात्यात जमा करण्यासाठीची विशेष जनसंपर्क मोहीम हाती घेतली आहे.

निष्क्रीय खात्यातून अन्य खात्यांत पैसे जमा करण्यासाठी मार्गदर्शन
पुणे – केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतील, ईपीएफओ म्हणजेच, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या, पुण्याच्या प्रादेशिक कार्यालयाने, निष्क्रिय ईपीएफ खात्यांमधून, पैसे ग्राहकांच्या इतर खात्यात जमा करण्यासाठीची विशेष जनसंपर्क मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम २७ मे रोजी सकाळी दहा ते दुपारी चार एकच दिवस असणार आहे.
कर्मचारी भविष्य निधी संघटना कामगार, कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी २७ मे रोजी निधी आपके निकट २.० हा जिल्हास्तरीय संपर्क कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमादरम्यान, जिल्हा नोडल अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील एक पथक कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांचे निराकरण करणार आहेत.
ज्या व्यक्तीची पीएफसंबंधीची, निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन देणे थांबवले आहे किंवा ज्यांच्या जीवन प्रमाणपत्रांची मुदत संपत आहे, त्यांना त्यांचे डीएलसी अद्ययावत करण्यासाठी या संधीचा लाभ दिला जात आहे, जेणेकरून त्यांना त्यांचे निवृत्तीवेतन सुरळीत आणि अखंडपणे मिळत राहील. या शिबिरात वर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील एक पथक या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित असणार आहे.
ईपीएफओच्या, यूएनएन आधारित सेवा, आधार पडताळणी आणि बँक खाते सीडिंग अशा डिजिटल सुविधांसह संबंधित लोकांशी संपर्क साधून त्यांना विनासायास आपले दावे निकाली काढता येतील, यासाठी मदत केली जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त, प्रभारी अधिकारी लोकेश गुप्ता यांनी दिली.





