पुणे : दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि. 6) विनामुल्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.सोमेश्वर फाउंडेशनचे सनी निम्हण व रामेश्वर नाईक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या शिबिरासाठी 22 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पूर्व तपासणी अभियान राबविण्यात आले होते त्यात. सुमारे 57 हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यातील जवळपास 30 हजारहून अधिक नागरिकांची या शिबिरात तपासणी करून त्यांचे रोगनिदान केले जाणार आहे. तसेच, त्यातील ज्या नागरिकांना वैद्यकीय साहित्याची गरज आहे त्यांना ते दिले जाणार असून ज्या नागरिकांची शस्त्रक्रीया तसेच इतर उपचार गरजेचे आहेत. त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या आरोग्य योजनेतून मोफत उपचार दिले जाणार असल्याचे सनी निम्हण यांनी यावेळी स्पष्ट केले. कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या शिबीराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता होणार आहे. यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत, शिबीरात विनामुल्य औषधोपचार व शस्त्रक्रियांसह गरजु रूग्णांना कृत्रिम अवयव, चष्मे, वृध्दकाठी, दिव्यांग साहित्य, कर्णयंत्र, दातांच्या कवळ्या यांचेही वाटप करण्यात येणार आहे. देशातील नामांकित डॉक्टर होणार सहभागी दरम्यान, या शिबिरात वेगवेगळया रूग्णांसाठी तब्बल 80 बाह्य रूग्ण विभाग उभारले जाणारी देशातील नामांकित डॉक़्टरांच्या माध्यमातून करून पुढील उपचाराची दिशा निश्चित केली जाणार आहे. त्यात, डॉ.के.एच संचेती, डॉ. गौतम भंसाळी, डॉ. वाकणकर, डॉ. रमाकांत देशपांडे,डॉ चंदनवाले, डॉ. तांबे, डॉ. अमित मायदेव, डॉ. अजय चौरसिया, डॉ. विकास महात्मे, डॉ. वाकणकर, डॉ. यशराज पाटील.डॉ. ललवाणी हे रूग्णांची तपासणी करणार आहेत. या शिवाय, शिबिराच्या ठिकाणी पॅथलॉजी, एक्स रे, सोनेग्राफी. टूडी इको तसेच इतर काही वैद्यकीय तापसण्याही जागेवरच करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.