Pune News : कोथरूडमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला; जुन्या तक्रारीच्या रागातून हल्ल्याचा संशय
कोथरूड परिसरात एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात अमित शिंदे याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली.

Pune News : कोथरूड परिसरात एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात अमित शिंदे याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, काही महिन्यांपूर्वी दिलेल्या तक्रारीच्या रागातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी निलेश घायवळ याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याचाच राग मनात धरून पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपींनी कोथरूडमध्ये अमित शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.
हल्ल्यात अमित शिंदे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, हल्ल्यामागील नेमके कारण, आरोपींचा सहभाग आणि पूर्ववैमनस्याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न यासह अन्य गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.





