Pune News : इमारतवीरून पडून महिलेचा मृत्यू; पोलिस आयुक्तालयासमोरली न्यूक्लीअस मॉलमधील घटना
घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रेश्र्मा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून देण्यात आला.

Pune News : हाऊसकीपिंगचे काम करणाऱ्या एका महिलेचा इमारतीच्या नवव्या मजल्यावरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला. रेश्र्मा महेबूब इनामदार (.44,रा. सोमवार पेठ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
ही घटना गुरुवारी (दि.30) सायंकाळी साडेचार ते पाच वाजताच्या सुमारास पोलिस आयुक्तालयासमोरील न्यूक्लीअस मॉलमध्ये घडली. याप्रकरणी, बंडगार्डन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्र्मा इनामदार या गेल्या आठ ते दहा वर्षापासून न्यूक्लीअस मॉल येथे हाऊसकिपींगचे काम करत होत्या. गुरूवारी सकाळी आठ वाजता त्या कामावर आल्या होत्या.
नवव्या मजल्यावर साफसफाईचे काम करत असताना रेश्र्मा डक्टमध्ये खाली पडल्या. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रेश्र्मा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून देण्यात आला. पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.





