Pune News : पतीपेक्षा पत्नीचे उत्पन्न जास्त.., न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रावरून उघड; अंतरिम पोटगीची मागणी फेटाळली

पुणे : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्याने तिची पोटगीची मागणी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एस.एन.रुक्मे यांनी फेटाळली. तिने उत्पन्न ६८ हजार ८२३ रुपये असल्याचे म्हटले आहे. मात्र, आता सर्वोच्च न्यायलयाच्या निर्देशानुसार पती-पत्नीने दोघांनीही असलेली संपत्ती, उत्पन्नाचे श्रोत याची माहिती शपथपत्राद्वारे न्यायालयात देणे बंधनकारक आहे.
यात दिलेल्या फेब्रुवारी २०२४ च्या पगार पत्रावरून तिला दरमहा १ लाख ११ हजार ८५० रुपये पगार आहे. नेट रक्कम ८४ हजार ८६७ रुपये हातात येत असल्याचे दिसून येत आहे. ही रक्कम पतीच्या उत्पन्नापेक्षा अधिक आहे. तसेच ती आजारी आहे. तिला उपचार सुरू असल्याचे म्हणत आहे. मात्र, तिने याबाबत् कोणतेही कागदपत्र जोडले नाही. त्यामुळे तिचा पोटगीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.
पतीतर्फे द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॅड. कल्पना निकम यांनी न्यायालयात बाजू मांडली. विवाहानंतर ११ महिने संसार केल्यानंतर जानेवारी २०१६ मध्ये ती घर सोडून गेली. ती परत आलीच नाही. या पार्श्वभूमीवर पतीने स्पेशल मॅरेज ॅक्टनुसार चार वर्षाहून अधिक काळ विभक्त राहत असल्याचे कारण देत घटस्फोटासाठी दावा दाखल केला.
त्यानंतर तिने अंतरिम पोटगीसाठी अर्ज केला. पती जिम ट्रेनर आहे. त्याचे कॅफे आहे. ८० हजार रुपये त्याचे दरमहा उत्पन्न आहे. ती पण कमविते. मात्र, तिचे उत्पन्न ६८ हजार आहे. हे पतीपेक्षा कमी आहे. ती आजारी असते. उपचार घ्यावा लागत असल्याने पोटगीची मागणी केली. यास पतीच्या वकिलांनी विरोध केला. त्याचे दहावी शिक्षण झाले आहे.
तो दरमहा आठ हजार रुपये उत्पन्न असल्याचे न्यायालयात सांगितले. मात्र, तिचे उत्पन्न जास्त असल्याचे दिसून येत आहे. पतीचे उत्पन्न ८० हजार असल्याचे पत्नीचे म्हणणे आहे. मात्र, त्याचा कागदोपत्री पुरावा नाही. जरी ८० हजार समजले, तरीही पत्नीचे उत्पन्न त्यापेक्षा जास्त असल्याचा निष्कर्ष काढत् पोटगीची मागणी फेटाळली.
पत्नीने अंतरिम पोटगीची मागणी केली आहे. मात्र, न्यायालयात दाखल कागदपत्रांवरून तिचे उत्पन्न जास्त असल्याचे दाखवून दिले. त्यानुसार न्यायालयाने तिची मागणी फेटाळली.
– कल्पना निकम. पतीच्या वकील व उपाध्यक्ष, द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन





