Pune News : म्हाळुंगेतील खराब रस्त्यांविरोधात ग्रामस्थांचे तीव्र आंदोलन; ग्रामस्थ, सोसायटीधारक व तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग
म्हाळुंगे परिसरातील खराब व धोकादायक रस्त्यांच्या प्रश्नावर आज ग्रामस्थांसह परिसरातील रहिवासी नागरिकांनी (Pune News) तीव्र जनआंदोलन केले.

Pune News : म्हाळुंगे परिसरातील खराब व धोकादायक रस्त्यांच्या प्रश्नावर आज ग्रामस्थांसह परिसरातील रहिवासी नागरिकांनी (Pune News) तीव्र जनआंदोलन केले. या आंदोलनाला म्हाळुंगे ग्रामस्थ, विविध गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिक तसेच मोठ्या संख्येने तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
म्हाळुंगे परिसरातील रस्त्यांची (Pune News) मोठ्या प्रमाणात झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, खराब रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांना दैनंदिन प्रवासात होणारा त्रास याविरोधात सर्वजण एकत्र आले. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व वाहतुकीस सुलभ रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनाची दखल घेत पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत आंबेकर तसेच कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे हे आंदोलनस्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहिले. ग्रामस्थांच्या वतीने त्यांना रस्त्यांच्या समस्येबाबत निवेदन देण्यात आले. नागरिकांनी रस्त्यांची सद्यस्थिती, खराब रस्त्यांमुळे होणारे अपघात तसेच वाहतुकीच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
यावेळी नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत रस्त्यांच्या प्रश्नावर तीव्र संताप व्यक्त केला. “रस्ता आमचा हक्काचा, खड्डे बुजवा जीव वाचवा,” “आयटी पार्क शेजारी, पण रस्त्यांची दुर्दशा भारी,” अशा विविध घोषणा देत नागरिकांनी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
म्हाळुंगे परिसरातील रस्त्यांचा प्रश्न तातडीने सोडवून नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित व वाहतुकीस सुलभ रस्ते उपलब्ध करून द्यावेत, हीच ग्रामस्थ व परिसरातील रहिवाशांची प्रमुख मागणी आहे.
आंदोलनकर्ते व नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक
आंदोलनादरम्यान काही नागरिक व स्थानिक नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्यात रस्त्यांच्या प्रश्नावर काही काळ शाब्दिक चकमक झाली. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, हा प्रश्न अनेक (Pune News) दिवसांपासून प्रलंबित असल्याचे सांगितले. काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, उपस्थित नागरिक व पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती शांत झाली.






