Pune News: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक; वडील किसनराव मोहोळ यांचे निधन
Pune News: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल ४० वर्षे बजावली सेवा; कर्तव्यनिष्ठ स्वभाव आणि पैलवान म्हणून होती मोठी ओळख.
Updated On:

Pune News: केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ यांचे गुरुवारी (दि. १८ जून) रात्री १०.२० वाजता दुःखद निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. किसनराव मोहोळ यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल ४० वर्षे सेवा बजावली होती. आपल्या कर्तव्यनिष्ठ स्वभावामुळे त्यांनी सहकारी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. ते नामवंत पैलवान म्हणूनही परिचित होते.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शुक्रवार, दि. १९ जून रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत कोथरूड येथील वेणूकृष्णा निवासस्थान येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.





