Pune news : ज्येष्ठ नागरिकाला मारण्याची दोन लाखाची सुपारी; पीएमपी चालक आणि कंडक्टरसह तीघे अटक

पुणे – पदमावती येथे ज्येष्ठ नागरिकाच्या गळयावर वार केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तीघांना अटक केली आहे. या ज्येष्ठ नागरिकाला मारण्यासाठी त्याच्या शेजारच्याने दोन लाखाची सुपारी दिली होती.
वार करणारा, सुपारी घेणारा आणि सुपारी देणाऱ्या अशा तीघांनाही अटक करण्यात आली आहे. हा हल्ला ज्येष्ठ नागरिक भानामती करीत असल्याचे संशयावरून करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी सोनु पांडु होडे ( ६७ रा.मोरे यस्ती रांका ज्वेलर्स मागे पद्मावती) यांच्यावर पदमावती येथील फिश मार्केट समो चाकूने गळ्यावर वार करण्यात आले होते. ही घटना १५ जून रोजी घडली होती.
याप्रकरणी सागर सतीष कुंभार ( ४१ , रा.सी/६/१ सुपर इंदीरानगर बिबवेवाडी ),तौरस बाळु कारले ( ४३ रा.बी/५९/१९ सुपर इंदीरानगर बिबवेवाडी) आणि सागर शशीकांत सोनार ( ३२ रा.मोरे वस्ती रांका पद्मावती) यांना अटक करण्यात आली आहे.
यातील तौरस कारले हा पीएमपीमध्ये कंडक्टर तर सागर सोनार हा चालक आहे. घटना घडल्यानंतर फिर्यादीने होडे यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता. यामुळे तपासात सुरवातीला कोणताही धागा मिळत नव्हता.
दरम्यान तपास पथकातील पोलीस हवालदार अमोल पवार, किरण कांबळे, अमित पदमाळे यांना खबर मिळाली की हल्ला करणारा आरोपी कुंभार हा बिबवेवाडी येथील घरी आहे. त्याला घरातून ताब्यात घेण्यात आला.
तेव्हा त्याने तौरस कारले ( रा. बिबवेवाडी ) याचे सांगणेचरुन हल्ला केला असल्याची कबुली दिली. त्यासाठी तौरस कारले याने ५० हजार रुपयांची सुपारी दिली होती. यमुळे पोलिसांनी तौरस कारले यास अप्पर डेपो येवुन ताब्यात घेतले .
त्याचेकडे तपास करता त्याने ही सुपारी सागर सोनार (रा.मोरे वस्ती, पदमावती) याने दिल्याची माहिती दिली. त्यासाठी सागर सोनार याचेकडुन दोन लाख रुपये घेतल्याचे सांगितले. तौरस कारले याचे कबुली वरुन सागर सोनार ( रा.मोरे वस्ती पद्मावती ) यास ताब्यात घेवुन तपास करण्यात आला.
तेव्हा तो फिर्यादी होडे यांचा शेजारी निघाला. तपासात त्याने सोनु होडे हे करणी, भानामती सारखे प्रकार करुन त्रास देत असल्याने व आमचे घर बळकावण्याचा प्रयत्न करीत असल्याने हे कृत्य केल्याचे सांगितले. याप्रकरणाचा तपास युवराज पोठरे करत आहेत.
हीक कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील , उपायुक्त स्मार्तना पाटील , सहायक आयुक्त नंदीनी बग्यानी , वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे , पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे,
सहायक उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस हवालदार अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, विनोद जाधव, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, अमित पदमाळे सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ, खंडू शिंदे यांनी केली आहे.





