Pune News: शांतता रॅली निमित्ताने शहरात वाहतूक बदल

पुणे – अखंड मराठा समाजाकडून काढण्यात येणाऱ्या शांतता रॅली निमित्ताने आज शहरातील विविध भागात वाहतूक बदल करण्यात आला आहे. या कालावधीत वाहनधारकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती वाहतूक वगळून देण्यात आली.
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सारसबाग येथुन मराठा आरक्षण शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. तेथून बाजीराव रोड, आप्पा बळवंत चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा एस.एस.पी.एम.एस. मार्गे जंगली महाराज रोडने गरवारे पुल छत्रपती संभाजी पुतळा येथे विसर्जन होणार आहे.
रॅलीमुळे जेधे चौक परिसर, सोलापुर रोड, सातारा रोड, सिंहगड रोड, टिळक रोड, शास्त्री रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, जे. एम रोड, कर्वे रोड, तसेच खंडोजी बाबा चौक या परिसरा मधील वाहतुकीमध्ये बदल करणे आवश्यक असल्याने आवश्यकते नुसार वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.
त्यानुसार नवले पुलाकडून येणारी वाहतुक नवीन बोगद्याकडे डायव्हर्शन करण्यात येईल. खडीमशीन चौक जड वाहने कात्रजकडे न सोडता बोपदेव घाटाकडे जातील. रॅली कात्रज चौक ते होल्गा चौक येताना रॅली पुढे जाईल तशी पाठीमागे वाहतुक सोडण्यात येणार आहे. जेधे चौक ते सिंहगड रोड वाहतुक व्होल्गा चौक, मित्रमंडळ चौक व सावरकर चौक अशी जाईल.
सिंहगडरोड कडून येणारे वाहतुक दांडेकर पुल, सावरकर चौक, मित्रमंडळ चौक व व्होल्गा चौक असे जाईल. एस. पी कॉलेज चौक पुरम चौकाकडे वाहतुक बंद राहील. सातारा रोडने मार्केटयार्ड जंक्शन येथून जेधे चौकाकडे वाहतुक बंद राहील.
रॅलीच्या मार्गावरील वाहतूक जगोजागी वळविण्यात आली असून रॅली जशी पुढे जाईल त्याप्रमाणे पाठीमागील चौक वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली.





