Pune News : विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळायला हवे – डॉ. पंडित विद्यासागर
आता दिवसेंदिवस शिक्षण खुप महाग होत चालले असून शिक्षणातही खासगीकरणही वाढले आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षण (Pune News) मिळायला पाहिजे.

Pune News : आता दिवसेंदिवस शिक्षण खुप महाग होत चालले असून शिक्षणातही खासगीकरणही वाढले आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षण (Pune News) मिळायला पाहिजे.
याकडे सर्वांनीच लक्ष द्यायला पाहिजे, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune News) गुणवत्ता सुधार योजने अंतर्गत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या येरवडा येथील डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात उच्च शिक्षण आणि शाश्वत विकास यावर एक दिवसीय राज्यस्तरीय परिसंवाद घेण्यात आला. यावेळी बीजभाषक म्हणून डॉ. पंडित विद्यासागर बोलत होते.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, उपाध्यक्ष डॉ. डी. जी. देशकर, सचिव संजीव बोधनकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम बनसोडे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. डॉ. रुपेश थोपटे, राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. प्रमोद हिरोडे, परिसंवादाचे समन्वयक प्रा. शिवाजी मोटेगावकर, प्रा. कैलास शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी परिसंवांदात डॉ.माहेश्वरी गावित, डॉ. नवनाथ तुपे, डॉ.विकास माने, प्रा. डॉ. ललित भवरे या मान्यवरांचे विविध विषयावर व्याख्यान झाले. प्राध्यापकांच्या संशोधन पेपरच्या जर्नलचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शैक्षणिक गुणवत्ता ढासळत चालेली आहे. ती सुधारली पाहिजे. यासाठी मनुष्यबळाची उपलब्धता, सोयी-सुविधा, कौशल विकास, मुल्यमापन पध्दतीत बदल करायलाच लागणार आहेत, असे डॉ.पंडित विद्यासागर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा अन्य ज्ञानही देण्याची गरज निर्माण झालेली आहे. शिक्षण हे समाजाभिमुख व प्रगती साध्य करणारे असले पाहिजे, असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.






