Pune News : राज्य वकिल परिषदेच्या मतमोजणीला ब्रेक; उमेद्वारांनी आक्षेप घेतल्यानंतर मतमोजणी थांबविली
महाराष्ट्र आणि गोवा राज्य परिषदेच्या मतमोजणीदरम्यान उमेद्वार प्रतिनीधींनी आक्षेप घेतल्याने पहिल्याच दिवशी मतमोजणी थांबविण्यात आली.

Pune News : महाराष्ट्र आणि गोवा राज्य परिषदेच्या मतमोजणीदरम्यान उमेद्वार प्रतिनीधींनी आक्षेप घेतल्याने पहिल्याच दिवशी मतमोजणी थांबविण्यात आली.
मतपत्रिकेतील मतदान दाखविण्याच्या मागणीसह मतांच्या नोंदीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नेमणुकीला यावेळी आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे, वीस मतपत्रिकांच्या मोजणीनंतर उमेद्वारांनी अर्ज सादर केल्याने नोंदणी थांबविण्यात आल्याची माहिती ॲड. राणी कांबळे-सोनावणे यांनी दिली.
वकिलांची शिखर संघटना असलेल्या राज्य वकिल परिषदेसाठी मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्याची मतमोजणी मुंबई उच्च न्यायालयातील परिषदेचे कार्यालय आणि बॉम्बे लॉयर्स सोसायटी येथे होत आहे.
त्याची सुरवात सोमवारी सकाळी दहा वाजता परभणी जिल्ह्यापासून सुरवात करण्यात आली. वीस मतांची मोजणी होताच उमेद्वार प्रतिनिधींनी आक्षेप नोंदवित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला. त्यामुळे, मतमोजणीची प्रक्रिया उद्या होणार की मतमोजणी लांबणीवर पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






