Pune news : पुणे सातारा रस्त्यावरील पद्मावती परिसरात चारचाकी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने एक भरधाव कार पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या प्रवेशद्वाराला धडकली, या ठिकाणी खाद्य पदार्थ विक्रीच्या गाड्या असतात व खवय्यांची मोठी गर्दी असते. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र आण्णा भाऊ साठे सभागृहाच्या प्रवेशद्वाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रथमदर्शनीने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री दहाच्या सुमारास स्वारगेट कडून कात्रज च्या दिशेने एक चारचाकी जात होती, पद्मावती येथील टेबेंकर मळा च्या पुढे आल्या नंतर कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार खाद्य पदार्थ विक्री च्या गाड्यांच्या बाजूला ग्राहकांना बसण्यासाठी ठेवलेल्या स्टुल उडवून थेट प्रवेशद्वाराला धडकली, प्रवेशद्वार बंद असल्याने कार तेथेच थांबली. दरम्यान उपस्थित नागरिकांनी कारच्या दिशेने धाक घेतली, नागरिकांचा रोष पाहून घाबरलेल्या कार चालकांनी उलट्या दिशेने पुन्हा कार पळवली, आणि कार चालक पसार झाला.