Pune News : प्रेयसीने संपर्क तोडल्याने बहिणीवर गोळीबार; गंज पेठेतील घटना

पुणे : गेल्या महिन्यात शहरात सलग चार गोळीबाराच्या घटना घडलेल्या असतानाच शहराच्या मध्यभागात एकाने तरुणीवर गोळीबार केल्याची घटना घडली. प्रेयसीने संपर्क तोडल्याने एका तरुणाने तिच्या बहिणीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गंज पेठेत घडली. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही.
खडक पोलिसांनी याप्रकरणी तरुणाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी ऋषी बागुल आणि त्याचा साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका १८ वर्षीय तरुणीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास गंज पेठेत ही घटना घडली.
तक्रारदार तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेते. त्यांचा पत्रावळ्या आणि द्रोण तयार करण्याचा व्यवसाय आहे. तिची मोठी बहिण घटस्फोटित आहे. आरोपी ऋषी बागुलचे तिच्याशी प्रेमसंबंध आहेत.
कुटुंबीयांना याबाबतची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. वाद झाल्यानंतर बहिणीने आरोपी ऋषीशी संपर्क तोडला. त्यामुळे तो तिच्यावर चिडला होता





