pune news : कर्वे रोड येथील रांका ज्वेलर्स शोरूममध्ये श्रीराम मूर्तींचा पूजा सोहळा संपन्न !

pune news : अयोध्येतील श्रीराम मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेचा आणि राम मंदिर लोकार्पणाचा सोहळा संपन्न होत असतानाच पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या शोरूममध्येही श्रीराम मूर्तींचा पूजा सोहळा संपन्न झाला. रांका ज्वेलर्सचे वस्तुपाल रांका यांच्या हस्ते श्रीराम मूर्तींची पूजा व आरती करण्यात आली.
या सोहळ्याच्या निमित्ताने ढोल पथकाचे वादन झाले. या सोहळ्यासाठी कर्वे रस्त्यावरील व्यापारी असोसिएशनचे व्यापारी, खंडोजीबाबा चौकातील व्यवसायिक, श्रीकृष्ण तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसेच रांका ज्वेलर्सचे सर्व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.
“आजचा दिवस हा भारताच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहेच शिवाय जगाच्या इतिहासातही एक अविस्मरणीय दिवस म्हणून कायम राहील. हाच क्षण साजरा करत असताना आम्ही आमच्या शोरुममध्ये श्रीरामाचे अस्तित्व असावे, या हेतूने हा सोहळा आयोजित केला,” असे रांका ज्वेलर्सचे ओमप्रकाश रांका यांनी सांगितले.
श्रीराम हे आदर्श पुरुष असून सर्व नीती मूल्यांचे पालन करणारे आहेत. प्रभू श्रीरामाची हीच प्रेरणा आणि हीच ऊर्जा आम्हाला सतत लाभावी, या पवित्र भावनेतून आमच्या शोरूममध्येही श्रीराम आता अवतरले आहेत याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.





