Pune News | शिंदे यांच्या नेतृत्वामुळे विकासकामांचा विक्रमी वेग – उदय सामंत

प्रभात वृत्तसेवा
पुणे – हडपसर मतदारसंघातील विकासकामांचा वेग हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्पष्ट दृष्टीकोन आणि जनतेशी बांधिलकीमुळे शक्य झाला आहे. डीपी रस्त्यांच्या माध्यमातून परिसरातील वाहतूककोंडी कमी होईल, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.हडपसरमधील रहेजा चौक येथे अंतर्गत डीपी रस्ते व विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा सामंत यांच्या हस्ते झाला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, उद्योजक बाळासाहेब भानगिरे, माजी स्वीकृत नगरसेवक राकेश झांबरे, स्वाती टकले, उपजिल्हाप्रमुख अमर घुले, अभिमन्यू भानगिरे, सचिन तरवडे, सचिन भानगिरे, सिद्धांत भानगिरे, सुदर्शना त्रिगुनाईत, सारिका पवार, श्रुती नाझिरकर, श्रद्धा शिंदे, सुरेखा पाटील, सोनाली लांडगे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
या विकासकामांमुळे प्रत्येक नागरिकाचा हक्क असलेली सोय पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सामंत यांनी सांगितले. शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे म्हणाले की, या रस्त्यांच्या लोकार्पणामुळे हडपसरमधील वाहतूककोंडी लक्षणीय प्रमाणात कमी होईल. स्थानिक व्यवसाय, शाळा, आरोग्य सुविधा आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे. अनेक वर्षे रखडलेली कामे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या लोकाभिमुख नेतृत्वामुळे विक्रमी वेगाने पूर्ण झाली. दोन वर्षांत जे शक्य झाले, ते वीस वर्षांत झाले नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले.





