महिला सक्षमीकरणासाठी बचतगट चळवळ महत्वाची – उल्का कळसकर

पुणे – करोना संकटामुळे हजारो कुटूंबावर आर्थिक संक़ट ओढावले, या संकटाच्या काळात बचतगटांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी होणारे काम महत्वाचे ठरणारे आहे. अशा भावना महापालिकेच्या मुख्य लेखा अधिकारी उल्का कळसकर यांनी व्यक्त केल्या. इकोली बॅग व अद्या फाउंडेशन यांच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
इकोली बॅग च्या माध्यमातून सुमारे 1150 महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामध्ये कापडी पिशव्या ज्यूटच्या पिशव्या चे शिलाई काम गरजू महिलांना दिले जाते. संस्थेच्या संस्थापिका हर्षदा पाटील, मार्केटींग हेड सरिता आर्या यावेळी उपस्थित होत्या.
इकोलीच्या येणाऱ्या दोन वर्षात नांदेड सिटी व लगतच्या ग्रामीण भागातील किमान दहा हजार महिलांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे यावेळी पाटील म्हणाल्या. इकोली बॅग्स च्या वेबसाईटचे उद्घाटन यावेळी कळसकर यांच्या हस्ते करण्यात आले.





