Pune News : ३२० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पुणे : धायरी परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील तसेच घराकाम करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लागावा या उद्देशाने शिववंदना मित्र परिवारातर्फे ३२० विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य किट वाटप करण्यात आले. हा उपक्रम श्री शिवराज्याभिषेक दिन व अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता.
या उपक्रमात घरकाम करणाऱ्या महिलांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या वेळी आमदार भीमराव तापकीर, वैभव देशमुख, यशवंत लायगुडे, अवधूत जोशी, गणेश नांगरे, आशाताई बेनकर, लक्ष्मी कदम, निलेश मानकर, संदीप खिरीड आणि शिववंदना मित्र परिवाराचे संस्थापक प्राज भिलारे उपस्थित होते. शालेय साहित्याअभावी कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. या विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन यश मिळवावे आणि त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य मिळवून द्यावे, हाच या उपक्रमामागचा उद्देश ठेवत हा उपक्रम आला.




