pune news : सराईत गुन्हेगार पिस्तूलसह जेरबंद : बंडगार्डन पोलिसांची कारवाई

pune news – बंडगार्डन पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला पिस्तूल आणि दोन जीवंत राऊंडसह अटक केली. त्याच्यावर खूनाच्या प्रयत्नासह तब्बल सहा गुन्हे आहेत.
गुन्हेगार असल्याने प्रतिस्पर्ध्यांच्या भितीने त्याने पिस्तूल जवळ बाळगायला सुरवात केली होती. त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बंडगार्डन पोलीसांचे तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार ज्ञाना बडे व मनोज भोकरे यानां खबर मिळाली कि एक व्यक्ती कमरेला पिस्तूल लावून साधू वासवानी चौक या ठिकाणी येणार आहे.
त्यानूसार सापळा रचून चेतन लक्ष्मण चव्हाण (22 रा – राहूल नगर , शिवणे ) याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता 1 पिस्तूल आणि दोन जिवंत राऊंड सापडले.
ही कारवावाई अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील , साहाय्यक आयुक्त संजय सुर्वे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत भस्मे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे,
पोलीस हवालदार सुधीर घोटकुले, अनिल कुसाळकर, अंमलदार ज्ञाना बडे, संजय वणवे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांचे पथकाने केली आहे.





