Pune News : वाघोलीत वाघेश्वर मंदिर ते लाईफ लाईन हॉस्पिटल पर्यंत रस्ता सुधारणा कामाचा शुभारंभ
Updated On:

वाघोली : हायब्रीड ॲम्युनिटी प्रकल्प अंतर्गत तसेच सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग पुणे यांच्या अंतर्गत वाघोली गावातील वाघेश्वर ते लाईफ लाईन हॉस्पिटल मुख्य पुणे नगर महामार्ग रस्ता सुधारणा कामाचा शुभारंभ शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कटके, माजी सरपंच वसंत काका जाधवराव, संग्राम जाधवराव, अनिल जाधवराव, समीर भाडळे, अनिल सातव, सुनील जाधवराव, मच्छिंद्र सातव, विजय जाचक, जयप्रकाश सातव पाटील, संपत गाडे, सुधीर भाडळे, रामदास शिंदे, मारुती गाडे, संदीप जाधव,कल्पेश जाचक, शिवदास पवार, मंगेश सातव, संतोष कटके, संदीप कटके, पिंटू कटके, विवेक बिडकर, माजी सैनिक, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.





