pune news : वाघोलीत झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीतून ग्रामस्थांच्या पुढाकाराने सुटका; प्रवाशांकडून होतोय अभिनंदनाचा वर्षाव !

वाघोली (प्रतिनिधी) – रस्त्यात बंद पडलेल्या अवजड वाहतूक करणारा ट्रक मुळे झालेली वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी पोलिसांबरोबर ग्रामस्थांनी दोन तास परिश्रम घेऊन वाहतूक कोंडी दूर करून नागरिकांचा मार्ग सुकर केला आहे.
दि. ७ रोजी बाराच्या सुमारास वाघेश्वर मंदिर परिसरात अवजड वाहतूक करणारा ट्रक अचानक बंद पडल्याने वाघोली मध्ये प्रचंड वाहतूक कोंडी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
लोणीकंद वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत पाटील व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर वाघोली मधील वाहतूक कोंडी दूर करणाऱ्या वाहतूक नियंत्रण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी दोन तास परिश्रम करून,
चार-चार किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा लांब लागलेल्या वाहनांच्या रांगा मधून नागरिकांची सुटका केली असून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल प्रवाशांकडून ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वाघोली तालुका हवेली येथे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी लोणीकंद वाहतूक शाखा पोलिस व ग्रामस्थांनी पुढाकार घेत वाहतूक कोंडीतून ग्रामस्थांची सुटका करण्याचा उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वाघोली आणि वाहतूक कोंडी हे नित्याचे सूत्र झाले असले तरी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाच्या मदतीने ग्रामस्थांच्या मदतीने वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी कामगिरी केली जात असल्याने या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वाघोली येथील वाहतूक नियंत्रण समितीचे प्रमुख संपत गाडे, गणेश तांबे, सनी अन्सारी व इतर कार्यकर्ते व लोणीकंद वाहतूक शाखा कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोली येथील चौकात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ग्रामस्थ पोलिसांसोबत उभे राहून वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करत असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लोणीकंद वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व वाहतूक नियंत्रण समितीच्या सर्व सदस्यांच्या साथीने आगामी काळात ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी सदृश्य परिस्थिती निर्माण होईल.
त्या-त्या ठिकाणी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कामगिरी करणार असल्याचे वाहतूक नियंत्रण समितीचे मुख्य कार्यवाह संपत गाडे, गणेश तांबे, सनी अन्सारी यांनी सांगितले आहे.





