मंत्री झाले पुणेकर..! खासदार ‘मुरलीधर मोहोळ’ केंद्रात मंत्रीपदाची शपथ घेणार
Updated On:

पुणे – खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपदाची संधी मिळणार असून, आजच्या (दि. 9) शपथविधी सोहळ्यात मोहोळ मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
त्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण असून, कोथरूड येथील मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयासमोर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी करत आनंदोत्सव साजरा करत आहे.
यावेळी ‘काय म्हणता पुणेकर, मंत्री झाले पुणेकर’ असा घोषणा देत जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी दुष्यंत मोहोळ, गणेश वरपे, कैलास मोहोळ, दिनेश माथवड, नितीन शिंदे, रफीक शेख, गणेश लोखंडे, अमर कोकाटे यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





