Pune News | खराब हवामानामुळे पुणे-दिल्ली विमान हैदराबादला वळविले
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पुणे – हवामान खराब असल्यामुळे पुणे-दिल्ली विमान हैदराबादकडे वळविण्यात आले. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला. या विमानाने गुरूवारी (दि. २८) रात्री साडेनऊ वाजता पुणे विमानतळावरून उड्डाण केले. मात्र, लँडिंग करण्यापूर्वीच हवामान खूप खराब झाल्याने वैमानिकाने विमान हैदराबाद विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेतला.
यामुळे विमानातील प्रवाशांना काही तासांसाठी हैदराबाद येथे थांबावे लागले. या घटनेनंतर, प्रवाशांना दिल्लीला परत नेण्यासाठी शुक्रवारी (दि. २९) सकाळी नऊ वाजता विमानाने दिल्लीकडे उड्डाण केले. हे विमान एक फेरी फ्लाइटचे होते, त्याचा मुख्य उद्देश प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी सुरक्षितपणे पोहोचवणे हा असतो, असे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.





