Pune News : पुणे बार असोसिएशन २०२५-२६ वार्षिक निवडणूक: अॅड.गिरीष शेडगे, अॅड.विजयराज दरेकर मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी

Pune Bar Association – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या २०२५-२६ या वार्षिक निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. गिरीष शेडगे, अॅड.विजयराज दरेकर काम पाहणार आहेत. याबाबतचे नियुक्तीपत्र पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. संतोष खामकर यांनी दिले.
याबरोबरच अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. अमोल जाधव, अॅड.अनिल ऊर्फ अण्णासाहेब पवार, उप निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड.प्रविण येसादे, ॲड. सुप्रिया कोठारी, अॅड.सचिन झालटे पाटील, अॅड.अतुल आर.पाटील, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड.संदेश जायभाय, अॅड.प्रभाकर सोनावणे, अॅड.रामचंद्र चांदारे, अॅड.विकास उंद्रे, अॅड.हेमंत भांड, अॅड.कादंबरी दौंडे आणि अॅड.सचिनकुमार गेलडा यांची नियुक्ती झाली आहे.
पुणे बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक दरवर्षी ३१ जानेवारी रोजी होत असते. यंदा ती ३१ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. लवकरच निवडणूक प्रक्रीया जाहीर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अंतिम मतदार यादी प्रसिध्द !
निवडणूकीसाठी मतदान करणाऱ्या वकिलांची अंतिम मतदार यादी ही प्रसिध्द झाली आहे. पुणे बार असोसिएशनचे ७ हजार ८३८ कायमस्वरूमी सभासद आणि २८२४ वार्षिक सभासद या निवडणूकीमध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहेत.




