Pune news : नवले पूल परिसरात आंदोलनाला बंदी.! पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश
मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी याबाबतचे आदेश दिले

पुणे : मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी याबाबतचे आदेश दिले.
नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात शनिवारी (२ मे) सायंकाली आंदोलन केले.
आंदाेलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी करून चार तास या भागात रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे या भागातील वाहतूक ठप्प झाले.
मुंबई, तसेच साताऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. वाहनांची रांग पंधरा किलोमीटरपर्यंत गेली होती. वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका, प्रवासी, मालवाहू वाहने अडकून पडली होती.
नागरिक, तसेच प्रवाशांनी याबाबतची तक्रार पोलीस नियंत्रण कक्षाकडे केली होती. या घटनेनंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांशी संवाद साधला होता





