Pune News: पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; दोन पिस्तुलासंह तीन काडतुसे जप्त

पुणे : पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना पोलिसांनी शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकात पकडले. सराइतांकडून दोन पिस्तुलासंह तीन काडतुसे जप्त करण्यात आली.
शुभम अनिल शिंदे ( २४, रा. महर्षीनगर) आणि सिद्धेश अशोक शिगवन (१९, रा. गुलटेकडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकात (सेव्हन लव्हज चौक) शिंदे आणि शिगवन थांबले होते. त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले.
त्यांची झडती घेण्यात आली असताना दोघांकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले, तीन काडतुसे जप्त करण्यात आली. शिंदे आणि शिगवन यांनी पिस्तूल का बाळगले, तसेच त्यांना पिस्तूल कोणी दिले? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार , सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे पोलीस, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, नितीन जाधव, लखन ढावरे, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, समीर भोरडे, भालचंद्र दिवटे, कृष्णा गायकवाड, मयूर काळे, संतोष बारगज, उमेश मरुपती, शेखर खराडे, यांचे पथकाने केली आहे.





