Pune News : विषारी दारू प्रकरणात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मोठी कारवाई; हडपसर पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी निलंबित
हडपसर आणि फुगेवाडी परिसरातील विषारी हातभट्टी दारू प्रकरणानंतर पुणे पोलिसांकडून मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.

Pune News : हडपसर आणि फुगेवाडी परिसरातील विषारी हातभट्टी दारू प्रकरणानंतर पुणे पोलिसांकडून मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.
अमितेश कुमार यांनी हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, एपीआय सिकलगर आणि पोलीस उपनिरीक्षक मुलाणी यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते.
अवैध हातभट्टी दारूचा व्यवसाय सुरू असताना स्थानिक पोलिसांनी योग्य वेळी कारवाई का केली नाही, याबाबत संताप व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी जबाबदारी निश्चित करत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू असून अवैध दारू विक्री साखळीमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे. प्रशासनाकडून दोषींवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.





