Pune News : अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
Updated On:

पुणे – कर्वेनगर येथील एका एनजीओमधील बाथरूममध्ये एका पंधरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी ऑगस्ट महिन्यापासून या एनजीओमध्ये वास्तव्यास होती. इतरही अनेक मुली तिच्यासोबत वास्तव्यास आहेत. शनिवारी तिने येथील बाथरूममध्ये गळफास घेतला.
हा प्रकार समोर येताच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. अल्पवयीन मुलीने कुठल्या कारणातून आत्महत्येसारखे पाऊल उचलले, याचा डेक्कन पोलीस तपास करत आहेत.





