विश्रांतवाडी (प्रतिनिधी) – माता जिजाऊ प्रतिष्ठानच्यवतीने मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. “वनवास संपला अयोध्येचे राजे प्रभू श्रीराम परत आले, आनंदाचा सोहळा सुरू झाला, सर्व श्रीराम भक्तांचा जन्म धन्य झाला, प्रत्येकाच्या हृदयात आदर्श राजे प्रभू श्रीराम विराजमान झाले” याचा आनंद सोहळ्यात सहभागी प्रत्येक श्रीरामभक्तांच्या चेहऱ्यावर दिसत होता.या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगसेवक अनिल टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात सकाळी पालखी मिरवणुकीने झाली, याचबरोबर कलश पूजन, होम हवन, आदी धार्मिक विधी पार पडले. दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी विलोभनीय मनमोहक श्रीराम मूर्तीची पूजा आणि महाआरती करण्यात आली. तद्नंतर उपस्थित सर्वांनी “जय श्रीराम” या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी वडगावशेरी मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक, गुलाबराव टिंगरे, माजी नगरसेविका ऐश्वर्या जाधव, आरएसएसचे इनामदार काका, थानाराम चौधरी, संदीप पुरकर, मनोहर डबकारा, राजू चौधरी, हरिओम राजपुरोहित, प्रशांत बजाज, रोहित भोसले, रमेश खंडाळे, धनराज मुगळे, उद्योजक बाळासाहेब टिंगरे, अतुल टिंगरे, शशिकांत भोसले, संजय मोरे, चंद्रकांत जंजिरे, शामाताई जाधव, मनोज अगरवाल, कैलास पठारे, आशुतोष जाधव, जितेंद्र कराळेकर, अरविंद म्हापदी, संजय निकम, जयराम जाधव, भोला सावंत, के.पी.पाटील, उत्तम आडसुळे, तसेच भैरवनगर, आनंदपार्क, धानोरी परिसरातील श्रीरामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगदीश मुळीक यांनी श्रीराम मंदिर प्रतिष्ठापणेच्या आनंदोत्सव सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा मंगलमय सोहळा सर्वांना पाहता यावा याकरिता एलईडी स्क्रीनवर प्रक्षेपणाचे देखील आयोजन केले होते. याची देही याची डोळा एकाग्र चित्ताने अयोध्येतील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यात अनेकजण मग्न होते. कार्यक्रमाला आलेल्या श्रीराम भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.सुमारे ६ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तर सकाळ पासून आळंदीतील इंडियन आयडॉलमधील भजनी मंडळ, भैरवनगर व धानोरी मधील महिला भजनी मंडळ, लातूरकर महिला भजनी मंडळ यांनी श्रीरामाची सुमधुर भजने गायली.
आनंदोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी जगदीश देशपांडे, शैलेश रणनवरे, सुभाष पाटील, माऊली पडवळ, प्रकाश सुतार, जितेंद्र जगताप, अविनाश दिवेकर, योगेश निरभवणे, विवेक पाटील, स्वप्नील भोसले, दानशूर गुंजाळ,गोपाळ पाटील, विकास साळुंके, गुरुनाथ बिराजदार, संतोष कदम, गिरीश यादव, महेश सगरे, नीळकंठ गाढवे, नितीन उत्तरेम, दुर्गेश जंगम, सिद्धार्थ तरकसे, संजय कोकिरकर, सुमित महाडिक, राहुल गायकवाड तसेच माता जिजाऊ प्रतिष्ठाण व साई प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
आनंदपार्कमधील राज कदम, विभू मिश्रा, आशिष रायगुंडे, हनुमंत पुजारी, रिदांत छल्ला, रेवांत छल्ला, वैभव यलमटे या शालेय विद्यार्थ्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली होती. या मंदिराच्या शेजारी उभे राहून अनेकजणांनी फोटो काढले. तसेच प्रतिष्ठाणतर्फे ३६०डिग्री सेल्फी कॅमेऱ्याचे देखील आयोजन केले होते. यात आपले व्हिडिओ चित्रण करून आनंद साजरा केला. आलेले रामभक्त एकमेकांना जय श्रीराम म्हणत आलिंगन देऊन उत्सवाचा आनंद घेत होते. संपूर्ण परिसर पताक्यांनी भगवा करण्यात आला होता.