Pune News : प्रगती स्कुलमध्ये मराठी भाषा दिन साजरा
Updated On:

विश्रांतवाडी (प्रतिनिधी) : प्रगती स्कूलस् आणि ज्युनियर कॉलेजमध्ये मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. मराठी दिनाचे औचित्य साधून शाळेने विवीध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
त्यामध्ये मराठी वाचन, मराठी निबंध, मराठी पारंपरिक नृत्य ,मराठी पोवाडा आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच मुलींनी जात्यावरच्या ओव्या, फुगडी, कुसुमाग्रजांच्या कविता यांचे सादरीकरण केले, तसेच मुलांनी पारंपरिक लाठी काठीचे प्रदर्शन केले.
सर्व शाळेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमासाठी शाळेच्या उपाध्यक्षा व मुख्याध्यापिका यांनी मार्गदर्शन केले तसेच शितल पाटील, अपर्णा शिंदे, मोनिका वाल्मिकी, बीना नायर व इतर शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले




